Sai Aartian साईं आरतीयाँ

साईनाथ - सगुणोपासना
1. भूपाळी,

जोडूनियां कर चरणीं ठेविला माथा ।
परिसावी विनंती माझी सदुरुनाथा 1.
असो नसो भाव आलों तूझिया ठाया ।
कृपादृष्टीं पाहें मजकडे सतगुरु राया   2.
अखंडित असावें ऐसें वाटतें पायी ।
सांडूनी संकोच ठाव थोडासा देईं   3.
तुका म्हणे देवा माझी वेडीवांकुडी ।
नामें भवपाश हातीं आपुल्या तोड़ी 4.
2. भूपाळी,
उठा पांडुरंगा आतां प्रभातसमयो पातला ।
वैष्णवांचा मेळा गरुडपारीं दाटला 1.
गरुडपारापासुनी महाद्घारापर्यंत ।
सुरवरांची मांदी उभी जोडूनियां हात   2.
शुकसनकादिक नारद-तुबंर भक्तांच्या कोटी ।
त्रिशूल डमरु घेउनि उभा गिरिजेचा पती 3.
कलीयुगींचा भक्ता नामा उभा कीर्तनीं ।
पाठीमागें उभी डोळा लावुनियां जनी 4.
3. भूपाळी,
उठा उठा श्री साईनाथ गुरु चरणकमल दावा ।
आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा ।। ध्रु0 ।।
गेली तुम्हां सोडुनियां भवतमरजनी विलया ।
परि ही अज्ञानासी तुमची भलवि योगमाया ।
शक्ति न आम्हां यत्किंचितही तिजला साराया ।
तुम्हीच तीतें सारुनि दावा मुख जन ताराया ।। चा0 ।।
भो साइनाथ महाराज भवतिमिरनाशक रवी ।
अज्ञानी आम्ही किती तव वर्णावी थोरवी ।
ती वर्णितां भागले बहुवदनि शेष विधि कवी ।। चा0 ।।
सकृप होउनि महिमा तुमचा तुम्हीच वदवावा ।। आधि0 ।। उठा0 ।।   1.
भक्त मनीं सद्भाव धरुनि जे तुम्हां अनुसरले ।
ध्यायास्तव ते दर्शन तुमचें द्घारि उभे ठेले ।
ध्यानस्था तुम्हांस पाहुनी मन अमुचें धालें ।
परि त्वद्घचनामृत प्राशायातें आतुर झालें ।। चा ।।
उघडूनी नेत्रकमला दीनबंधु रमाकांता ।
पाहिं बा कृपादृष्टीं बालका जशी माता ।
रंजवी मधुरवाणी हरीं ताप साइनाथा ।। चा0 ।।
आम्हीच अपुले काजास्तव तुज कष्टवितों देवा ।
सहन करिशिल तें ऐकुनि घावी भेट कृष्ण धांवा ।। उठा उठा0 ।। आधिव्याधि0    2.
4. भूपाळी,
उठा पांडुरंगा आतां दर्शन घा सकळां ।
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा 1.
संत साधू मुनी अवघे झालेती गोळा ।
सोडा शेजे सुख आतां बंघु घा मुखकमळा    2.
रंगमंडपी महाद्घारीं झालीसे दाटी ।
मन उतावीळ रुप पहावया दृष्टी   3.
राही रखुमाबाई तुम्हां येऊं घा दया ।
शेजे हालवुनी जागें करा देवराया   4.
गरुड हनुमंत उभे पाहती वाट ।
स्वर्गीचे सुरवर घेउनि आले बोभाट    5.
झालें मुक्तद्घार लाभ झाला रोकडा ।
विष्णुदास नामा उभा घेऊनि कांकाड़ा    6.
5. अभंग,
घेउनियां पंचारती । करुं बाबांसी आरती ।।
करुं साई सी0 ।। 1 ।।
उठा उठा हो बांधव । ओंवाळूं हा रमाधव ।।
सांई र0 ।। ओं 0 ।। 2 ।।
करुनीयां स्थीर मन । पाहूं गंभीर हें ध्यान ।।
साईंचें हें0 ।। पा0 ।। 3 ।।
कृष्णनाथा दत्तसाई । जडो चित्त तुझे पायीं ।।
साई तु0 ।। जडो0 ।। 4 ।।

Sai Baba Aarti - Hindi
(साईनाथ - सगुणोपासना)
कांकंड आरती

कांकंड आरती

कांकडआरती करीतों साईनाथ देवा ।
चिनमयरुप दाखवीं घेउनि बालक-लघुसेवा ।। ध्रु0 ।।
काम क्रोध मद मत्सर आटुनी कांकडा केला ।
वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजवीला ।
साईनाथगुरुभक्तिज्वलनें तो मी पेटविला ।
तद्वृत्ती जाळुनी गुरुनें प्रकाश पाडिला ।
द्घेत-तमा नासूनी मिळवी तत्स्वरुपीं जीवा ।। चि0 ।। 1 ।।
भू-खेचर व्यापूनी अवघे हृत्कमलीं राहसी ।
तोचि दत्तदेव तू शिरड़ी राहुनी पावसी ।
राहुनि येथे अन्यत्रहि तू भक्तांस्तव धांवसी ।
निरसुनियां संकटा दासा अनुभव दाविसी ।
न कळे त्वल्लीलाही कोण्या देवा वा मानवा ।। चि0 ।। 2 ।।
त्वघशदुंदुभीनें सारें अंबर हें कोंदलें ।
सगुण मूर्ति पाहण्या आतुर जन शिरडी आले ।
प्राशुनि त्वद्घचनामृत अमुचे देहभान हरपलें ।
सोडूनियां दुरभिमान मानस त्वच्चरणीं वाहिले ।
कृपा करुनियां साईमाउले दास पदरिं ध्यावा ।। चि0 ।। कां0 चि0 ।। 3 ।।
भक्तीचिया पोटीं बोध कांकडा ज्योती ।
पंचप्राण जीवें भावें ओवाळूं आरती ।। 1 ।।
ओंवाळूं आरती माझा पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडोनी चरणीं ठेविला माथा ।। ध्रु0 ।।
काय महिमा वर्णूं आतां सांगणे किती ।
कोटी ब्रहमहत्या मुख पाहतां जाती ।। 2 ।।
राई रखुमाबाई उभ्या दोघी दो बाहीं ।
मयूरपिच्छ चामरें ढाळिति ठायींचे ठायीं ।। 3 ।।
तुका म्हणे दीप घेउनि उन्मनीत शोभा । 
विटेवरी  उभा दिसे लावण्यगाभा ।। 4 ।। ओवाळूं 0 ।।
पद (उठा उठा)
उठा साधुसंत साधा आपुलालें हित ।
जाईल जाईल हा नरदेह मग कैंचा भगवंत ।। 1 ।।
उठोनियां पहांटे बाबा उभा असे विटे । चरण तयांचे गोमटे अमृतदृष्टि अवलोका ।। 2 ।।
उठा उठा हो वेगेंसीं चला जाऊंया राउलासी । जळतिल पातकांच्या राशी कांकंड आरती देखिलिया ।। 3 ।।
जागें करा रुक्मिणीवर, देव आहे निजसुरांत । वेंगें लिंबलोण करा दृष्ट होईल तयासी ।। 4 ।।
दारीं वाजंत्रीं वाजती ढोल दमामे गर्जती । होते कांकड आरती माझा सदगरुरायांची।। 5 ।।
सिंहनाद शंखभेरी आनंद होतसे  महाद्घारी । केशवराज विटेवरी नामा चरण वंदितो ।। 6 ।।
भजन
साईनाथगुरु माझे आई । मजला ठाव घावा पायीं ।।
दत्तराज गुरु माझे आई । मजला ठाव घावा पायीं ।।
श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय ।।
श्री सांईनाथ प्रभाताष्टक
प्रभातसमयीं नभा शुभ रविप्रभा फांकली । 
स्मरे गुरु सदा अशा समयिं त्या छळे ना कली ।।
म्हणोनि कर जोडूनी करुं अतां गुरुप्रार्थना । 
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 1 ।।
तमा निरसि भानु हा गुरुहि नासि अज्ञानता । 
परन्तु गुरुची करी न रविही कधीं साम्यता ।।
पुन्हां तिमिर जन्म घे गुरुकृपेनि अज्ञान ना । 
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 2 ।।
रवि प्रगट होउनि त्वरित घालवी आलसा । 
तसा गुरुहि सोडवी सकल दुष्कृतीलालसा ।।
हरोनि अभिमानही जडवि तत्पदीं भावना । 
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 3 ।।
गुरुसि उपमा दिसे विधिहरीहरांची उणी । 
कुठोनि मग येई ती कवनिं या उगी पाहुणी ।।
तुझीच उपमा तुला बरवि शोभते सज्जना । 
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 4 ।।
समाधि उतरोनियां गुरु चला मशीदीकडे । 
त्वदीय वचनोक्ति ती मधुर वारिती सांकडें ।।
अजातरिपु सतगुरु अखिलपातका भंजना । 
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 5 ।।
अहा सुसमयासि या गुरु उठोनियां बैसले । 
वोलोकुनि पदाश्रिता तदिय आपदे नासिलें ।।
असा सुहितकारि या जगतिं कोड़ीही  अन्य ना । 
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 6 ।।
असे बहुत शाहणा परि न ज्या गुरुची कृपा । 
न तत्स्वहित त्या कळे करितसे रिकाम्या गपा ।।
जरी गुरुपदा धरी सुदृढ़ भक्तिने तो मना । 
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 7 ।।
गुरो विनति मी करीं हृदयमंदिरीं या बसा । 
समस्त जग हें गुरुस्वरुपची ठसो मानसा ।।
घड़ो सतत सत्कृती मतिहि दे जगत्पावना । 
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 8 ।।
स्रग्धरा
प्रेमें या अष्टकासी पढुनि गुरुवरा प्रार्थिती जे प्रभातीं ।
त्यांचे चित्तासि देतों अखिल हरुनियां भ्रांति मी नित्य शांती ।।
ऐसें हें साईनाथें कथुनि सुचविलें जेविं या बालकासी ।
तेवीं त्या कृष्णपायीं नमुनि सविनयें अर्पितों अष्टकासी ।। 1 ।।
पद
1. सांई रहम नजर करना, बच्चों का पालन करना ।। धु0 ।।
जाना तुमने जगत्पसारा, सबही झूठ जमाना ।। साई0 ।। 1 ।।
मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझको प्रभु दिखलाना ।। साई0 ।। 2 ।।
दास गनू कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना ।। साई0 ।। 3 ।।
2. रहम नजर करो, अब मोरे साई, तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई ।। धु0 ।।
मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा ।। मैं ना जानूं अल्लाइलाही ।। 1 ।।
खाली जमाना मैंने गमाया, साथी आखिर का और न कोई इलाही ।। 2 ।।
अपने मशीद का झाडू गनू है । मालिक हमारे, तुम बाबा साई ।। 3 ।।
3. तुज काय देऊं सावळ्या मी खाया तरी, मी दुबली बटिक नाम्याची जाण श्रीहरी ।
उच्छिष्ट तुला देणें ही गोष्ट ना बरी, तूं जगन्नाथ, तुज देऊँ कशी रे भाकरी ।
नको अंत मदीय पाहूं सख्या भगवंता । श्रीकांता ।
माध्यान्हरात्र उलटोनि गेली ही आतां । आण चित्ता ।
जा होईल तुझा रे कांकडा की राउळांतरीं । आणतील भक्त नैवेघ ही नानापरी ।।
4. श्री सदगुरु बाबासाई तुजवांचुनि आश्रय नाही, भूतली ।। धु0 ।।
मी पापी पतित धीमंदा । तारणें मला गुरुनाथा, झडकरी ।। 1 ।।
तूं शांतिक्षमेचा मेरु । तूं भवार्णवींचें तारुं, गुरुवरा ।। 2 ।।
गुरुवरा मजसि पामरा, आतां उद्घरा, त्वरित लवलाही, त्वरित लवलाही,
मी बुडतों भवभय डोही उद्घरा ।। श्री सदगुरु ।। 3 ।।
कांकड आरतीचा कार्यक्रम समाप्त
_________________________
माध्यान्ह आरती, दुपारी 12 वाजता
घेउनियां पंचारती । करुं बाबांसी आरती ।। करुं साईसी0 ।। 1 ।।
उठा उठा हो बांधव । ओंवाळूं हा रमाधव ।। साई र0 ।। ओ0 ।। 2 ।।
करुनीयां स्थीर मन । पाहूं गंभीर हें ध्यान ।। साईचें हे0 ।। पा0 ।। 3 ।।
कृष्णनाथा दत्तसाई । जडो चित्त तुझे पायीं ।। साईतु0 जडो0 ।। 4 ।।
आरती
1. आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा । चरणरजातली ।
घावा दासां विसांवा, भक्तां विसांवा ।। आ. धु. ।।
जाळुनियां अनंग । स्वस्वरुपीं राहे दंग । मुमुक्षुजनां दावी ।
निज डोळां श्री रंग ।। आ0 ।। 1 ।।
जया मनी जैसा भाव । तया तैसा अनुभव । दाविसी दयाघना ।
ऐसी तुझी ही माव ।। आ0 ।। 2 ।।
तुमचें नाम ध्यातां । हरे संसृतिव्यथा । अगाध तव करणी ।
मार्ग दाविसी अनाथा ।। आ0 ।। 3 ।।
कलियुगीं अवतार । सगुण पर ब्रम्ह साचार । अवतीर्ण झालसे ।
स्वामी दत्त दिगंबर ।। द0 ।। आ0 ।। 4 ।।
आठां दिवसां गुरुवारीं । भक्त करिती वारी । प्रभुपद पहावया ।
भवभय निवारी ।। आ0 ।। 5 ।।
माझा निजद्रव्यठेवा । तव चरणरजसेवा मागणें हेंचि आतां ।
तुम्हां देवाधिदेवा ।। आ0 ।। 6 ।।
इच्छित दीन चातक । निर्मल तोय निज सुख ।
पाजावें माधवा या । सांभाळ निज आपुली भाक ।। आ0 ।। 7 ।।
2. जय देव जय देव दत्ता अवधूता । साई अवधूता ।
जोडुनि कर तव चरणीं ठेवतों माथा । जय देव जय देव ।। धु ।।
अवतरसी तूं येतां धर्मातें ग्लानी । नास्तिकांनाही तू लाविसि निजभजनीं ।
दाविसि नाना लीला असंख्य रुपांनीं । हरिसी दीनांचें तू संकट दिनरजनी ।। ज0 ।। 1 ।।
यवनस्वरुपीं एक्या दर्शन त्वां दिधलें । संशय निरसुनियां तदद्घैता घालविलें ।
गोपीचंदा मंदा त्वांची उद्घरिलें । मोमिन वंशीं जन्मुनि लोकां तारिले ।। ज0 ।। 2 ।।
भेद न तत्वीं हिंदूयवनांचा कांहीं । दावायासी झाला पुनरपि नरदेही ।
पाहसिं प्रेमानें तू हिंदूयवनांही । दाविसी आत्मत्वाने व्यापक हां साई ।। ज0 ।। 3 ।।
देवा साईनाथ त्वत्पदनत भावे । परमायामोहित जनमोचन झणिं व्हावें ।
त्वत्कृपये सकलांचें संकट निरसावें । देशिल तरि दे त्वघश कृष्णानें गावें ।। ज0 ।। 4 ।।
अभंग
शिरडी माझें पंढरपुर । साईबाबा रमावर ।। 1 ।।
शुद्घ भक्ति चंद्रभागा । भाव पुंडलीक जागा ।। 2 ।।
या हो या हो अवघे जन । करा बाबांसी वंदन ।। 3 ।।
गणू म्हणे बाबा साई । धांव पाव माझे आई ।। 4 ।।
नमन
घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळयांनीं पाहीन रुप तुझें ।।
प्रेमें आलिंगिन, आनंदें पूजिन, भावें ओंवाळिन म्हणे नामा ।। 1 ।।
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुच  सखा त्वमेव ।।
त्वमेव विघा द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव ।। 2 ।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुद्घयात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।
करोमी  यघत्सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयामि ।। 3 ।।
अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्र भजे ।। 4 ।।
नामस्मरण
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे (इति त्रिवार)
पुष्पांजली
ऊँ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माण प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्या संति देवाः ।।
ऊँ राजाधिराजाय प्रसहृसाहिने नमो वयं वैश्रवणाय कूर्महे ।
स मे कामान्कामाय महृं कामेश्वरो वैश्रवणो दधातु ।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।

ऊँ स्वस्ति । साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठयं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी स्यात्सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यताया एकराळिति ।
तदप्येष श्लोकोडभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे ।
आविश्रितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।।
नमस्कारष्टक
अनंता तुला तें कसें रे स्तवावें । अनंता तुला तें कसें रे नमावें ।
अनंत मुखांचा शिणे शेष गातां । नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ।। 1 ।।
स्मरावें मनीं त्वत्पदां नित्य भावें । उरावें तरी भक्तिसाठीं स्वभावें ।।
तरावें जगा तारुनी मायताता । नमस्कार0 ।। 2 ।।
वसे जो सदा दावया संतलीला । दिसे अज्ञ लोकांपरी जो जनांला ।।
परी अंतरीं ज्ञान कैवल्यदाता । नमस्कार0 ।। 3 ।।
बरा लाधला जन्म हा मानवाचा । नरा सार्थका साधनीभूत साचा ।।
धरुं साइप्रेमा गळाया अहंता । नमस्कार0 ।। 4 ।।
धरावें करीं सान अल्पज्ञ बाला । करावें अम्हां धन्य चुंबोनि गाला ।।
मुखीं घाल प्रेमें खरा ग्रास आतां । नमस्कार 0 ।। 5 ।।
सुरादीक ज्यांच्या पदा वंदिताती । शुकादीक जयांतें समान्तव देती ।।
प्रयागादि तीर्थें पदीं नम्र होतां ।। नमस्कार0 ।। 6 ।।
तुझ्या ज्यां पदा पाहतां गोपबाली । सदा रंगली चित्वस्वरुपीं मिळाली ।।
करी रास क्रीडा सवें कृष्णनाथा । नमस्कार0 ।। 7 ।।
तुला मागतों मागणें एक घावें । करा जोड़ितों दीन अत्यंत भावें ।।
भवीं मोहनीराज हा तारि आतां । नमस्कार साष्टांग श्री साइनाथा ।। 8 ।।
प्रार्थना
ऐसा यई बा । साई दिगंबरा । अक्षयरुप अवतारा ।
सर्वहि व्यापक तूं । श्रुतिसारा । अनुसया त्रिकुमारा ।। धु0 ।।
काशी स्नान जप, प्रतिदिवशीं । कोल्हापुर भिक्षेसी ।
निर्मल नदि तुंग, जल प्राशी । निद्रा माहुर देशीं ।। ऐ0 ।। 1 ।।
झोळी लोंबतसे वामकरीं । त्रिशूल-डमरु-धारी ।
भक्तां वरद सदा सुखकारी । देशील मुक्ती चारी ।। ऐ0 ।। 2 ।।
पायीं पादुका जपमाला कमंडलू मृगछाला । धारण करिशी बा ।
नागजटा मुगुट शोभतो माथां ।। ऐ0 ।। 3 ।।
तत्पर तुझ्या या जे ध्यानीं । अक्षय त्यांचे स्रदनी ।
लक्ष्मी वास करी दिनरजनीं । रक्षिसि संकट वारुनि ।। ऐ0 ।। 4 ।।
या परिध्यान तुझें गुरुराया । दृश्य करीं नयनां या ।
पूर्णानंदसुखें ही काया । लाविसि हरिगुण गाया ।। ऐ0 ।। 5 ।।

श्री साईनाथमहिम्नस्तोत्रम्
सदा सत्स्वरुपं चिदानंदकंदं, जगत्संभवस्थानसंहारहेतुम् ।
स्वभाक्तेशच्या  मानुषं दर्शयंतं, नमामीश्वरं सदगुरुसाइनाथम् ।। 1 ।।
भवध्वांतविध्वंसमार्तडमीडयं, मनोवागतीतं मुनीध्र्यानगम्यम् ।
जगदव्यापकं निर्मलं निर्गुणं त्वां, नामामी 0 ।। 2 ।।
भवांभोधिमग्नार्दितानां जनानां, स्वपादश्रितानां ।
स्वभक्तिप्रियाणाम् । सुमद्घारणार्थ कलौ संभवंतं नमामी 0 ।। 3 ।।
सदा निंबवृक्षस्य मूलाधिवासात्सुधा स्राविणं तित्तमप्यप्रियं तम् ।
तरुं कल्पवृक्षाधिकं साधयंतं, नमामी ।। 4 ।।
सदा कल्पवृक्षस्य तस्याधिमूले भवद्घावबुद्घया सपर्यादिसेवाम् ।
नृणां कुर्वतां भुक्तिमुक्तिप्रदं तं, नमामी ।। 5 ।।
अनेकाश्रुतातक्र्यलीला विलासैः, समाविष्कृतेशानभास्वत्प्रभावम् ।
अहंभावहीनं प्रसन्नात्मभावं, नमामी ।। 6 ।।
सताः विश्रमाराममेवाभिरामं सदा सज्जनैः संस्तुतं सन्नमद्घिः ।
जनामोददं भक्तभद्रप्रदं तं, नमामी ।। 7 ।।
अजन्माघमेकं परं ब्रहृ साक्षात्स्वयं संभवं राममेवावतीर्णम् ।
भवदर्शनात्संपुनीतः प्रभोडहं, नमामी ।। 8 ।।
श्री साईश कृपानिधे  डखिलनृणां सर्वार्थसिद्घिप्रद ।
युष्मत्पादरजः प्रभावमतुलं धातापि वक्ताडक्षमः ।।
सद्घक्त्या शरणं कृतांजलिपुटः संप्रापितोस्मि प्रभो,
श्रीमत्साईपरेशपादकमलात्रान्यच्छरण्यं मम ।। 9 ।।
साईरुपधरराघवोत्तमं, भक्तकामविबुधद्रुमं प्रभुम ।
माययोपहतचित्तशुद्घये, चिंतयाम्यहमहनिशं मुदा ।। 10 ।।
शरत्सुधांशुप्रतिमप्रकाशं, कृपापात्रं तव साईनाथ ।
त्वदीयपादाब्जमसमाश्रितानां स्वच्छायया तापमपाकरोतु ।। 11 ।।
उपासनादैवतसाइनाथ स्तैर्मयो-पासनिना स्तुतस्त्वम ।
रमेन्मनो मे तव पादयुग्मे, भृडो, यथाब्जे मकरंदलुब्धः ।। 12 ।।
अनेकजन्मार्जीत-पापसंक्षयो, भवेद्घवत्पादसरोजदर्शनात् ।
क्षमस्व सर्वानपराधपूंजकान्प्रसीद साईश गुरो दयानिधे ।। 13 ।।
श्री साईनाथचरणामृतपूतचित्तास्तत्पादसेवनरताः सततं च भक्त्या ।
संसारजन्यदुरतौधविनिर्गतास्ते कैवल्यधाम परमं समवाप्नुवन्ति ।। 14 ।।
स्तोत्रमेतत्पठेद्घक्त्या यो नरस्तन्मनाः सदा ।
सदगुरोः साईनाथस्य कृपापात्रं भवेद् ध्रुवम ।। 15 ।।
प्रार्थना,
करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वाडपराधम् ।
विदितमविदितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे (श्रीप्रभो साईनाथ) ।। 1 ।।
श्री सच्चिदानंदसदगुरु साईनाथ महाराज की जय
माध्यान्ह आरतीचा कार्यक्रम समाप्त
___________________________

सूर्यास्ताच्या वेली
1. आरती
आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा । चरणरजातला ।
घावा दासां विसांवा, भक्तां विसांवा ।। आ. धु. ।।
जाळुनियां अनंग । स्वरुपरुपीं राहे दंग । मुमुक्षुजनां दावी ।
निज डोळां श्री रंग ।। आ0 ।। 1 ।।
जया मनी जैसा भाव । तया तैसा अनुभव । दाविसी दयाघना ।
ऐसी तुझी ही माव ।। आ0 ।। 2 ।।
तुमचें नाम ध्यातां । हरे संसृतिव्यथा । अगाध तव करणी ।
मार्ग दाविसी अनाथा ।। आ0 ।। 3 ।।
कलियुगीं अवतार । सगुणब्रहम साचार । अवतीर्ण झालसे ।
स्वामी दत्त दिगंबर ।। द0 ।। आ0 ।। 4 ।।
आठां दिवसां गुरुवारीं । भक्त करिती वारी । प्रभुपद पहावया ।
भवभय निवारी ।। आ0 ।। 5 ।।
माझा निजद्रव्यठेवा । तव चरणरजसेवा मागणें हेंचि आतां ।
तुम्हां देवाधिदेवा ।। आ0 ।। 6 ।।
इच्छित दीन चातक । निर्मल तोय निज सुख ।
पाजावें माधवा या । सांभाळ निज आपुली भाक ।। आ0 ।। 7 ।।
अभंग
शिरडी माझें पंढरपुर । साईबाबा रमावर ।। 1 ।।
शुद्घ बक्ती चंद्रभागा । भाव पुंडलीक जागा ।। 2 ।।
या हो या हो अवघे जन । करा बाबांसी वंदन ।। 3 ।।
गणू म्हणे बाबा साई । धांव पाव माझे आई ।। 4 ।।
नमन
घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळयांनीं पाहीन रुप तुझें ।।
प्रेमें आलिंगिन, आनंदें पूजिन, भावें ओंवाळिन म्हणे नामा ।। 1 ।।
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बेधुश्च सखा त्वमेव ।।
त्वमेव विघा द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव ।। 2 ।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुद्घयात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।
करोति यघत्सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयामि ।। 3 ।।
अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्र भजे ।। 4 ।।
नमस्कारन
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे (इति त्रिवार)
नमस्कारश्टक
अनंता तुला तें कसें रे स्तवावें । अनंता तुला तें कसें रे नमावें ।
अनंत मुखांचा शिणे शेष गातां । नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ।। 1 ।।
स्मरावें मनीं त्वत्पदां नित्य भावें । उरावें तरी भक्तिसाठीं स्वभावें ।।
तरावें जगा तारुनी मायताता । नमस्कार0 ।। 2 ।।
वसे जो सदा दावया संतलीला । दिसे अज्ञ लोकांपरी जो जनांला ।।
परी अंतरीं ज्ञान कैवल्यदाता । नमस्कार0 ।। 3 ।।
बरा लाधला जन्म हा मानवाचा । नरा सार्थका साधनीभूत साचा ।।
धरुं साइप्रेमा गळाया अहंता । नमस्कार0 ।। 4 ।।
धरावें करीं सान अल्पज्ञ बाला । करावें अम्हां धन्य चुंबोनि गाला ।।
मुखीं घाल प्रेमें खरा ग्रास आतां । नमस्कार 0 ।। 5 ।।
सुरादीक ज्यांच्या पदा वंदिताती । शुकादीक जयांतें समान्तव देती ।।
प्रयागादि तीर्थें पदीं नम्र होतां ।। नमस्कार0 ।। 6 ।।
तुझ्या ज्यां पदा पाहतां गोपबाली । सदा रंगली चित्वस्वरुपीं मिळाली ।।
करी रास क्रीडा सवें कृष्णनाथा । नमस्कार0 ।। 7 ।।
तुला मागतों मागणें एक घावें । करा जोड़ितों दीन अत्यंत भावें ।।
भवीं मोहनीराज हा तारि आतां । नमस्कार साष्टांग श्री साइनाथा ।। 8 ।।
प्रार्थना,
ऐसा यई बा । साई दिगंबरा । अक्षयरुप अवतारा ।
सर्वहि व्यापक तूं । श्रुतिसारा । अनुसयाडत्रिकुमारा ।। धु0 ।।
काशी स्नान जप, प्रतिदिवशीं । कोल्हापुर भिक्षेसी ।
निर्मल नदि तुंग, जल प्राशी । निद्रा माहुर देशीं ।। ऐ0 ।। 1 ।।
झोळी लोंबतसे वामकरीं । त्रिशूल-डमरु-धारी ।
भक्तां वरद सदा सुखकारी । देशील मुक्ती चारी ।। ऐ0 ।। 2 ।।
पायीं पादुका जपमाला कमंडलू मृगछाला । धारण करिशी बा ।
नागजटा मुगुट शोभतो माथां ।। ऐ0 ।। 3 ।।
तत्पर तुझ्या या जे ध्यानीं । अक्षय त्यांचे सदनीं ।
लक्ष्मी वास करी दिनरजनीं । रक्षिसि संकट वारुनि ।। ऐ0 ।। 4 ।।
या परिध्यान तुझें गुरुराया । दृश्य करीं नयनां या ।
पूर्णानंदसुखें ही काया । लाविसि हरिगुण गाया ।। ऐ0 ।। 5 ।।
श्री साईनाथमहिम्नस्तोत्रम्,
सदा सत्स्वरुपं चिदानंदकंदं, जगत्संभवस्थानसंहारहेतुम् ।
स्वबक्तेच्छया मानुषं दर्शयंतं, नमामीश्वरं सदगुरुसाइनाथम् ।। 1 ।।
भवध्वांतविध्वंसमार्तडमीडयं, मनोवागतीतं मुनीध्र्यानगम्यम् ।
जगदव्यापकं निर्मलं निर्गुणं त्वां, नामामी 0 ।। 2 ।।
भवांभोधिमग्नार्दितानां जनानां, स्वपादश्रितानां ।
स्वभक्तिप्रियाणाम् । सुमद्घारणार्थ कलौ संभवंतं नमामी 0 ।। 3 ।।
सदा निंबवृक्षस्य मूलाधिवासात्सुधासाविणं तित्तमप्यप्रियं तम् ।
तरुं कल्पवृक्षाधिकं साधयंतं, नमामी ।। 4 ।।
सदा कल्पवृक्षस्य तस्याधिमूले भवद्घावबुद्घया सपर्यादिसेवाम् ।
नृणां कुर्वतां भुक्तिमुक्तिप्रदं तं, नमामी ।। 5 ।।
अनेकाश्रुतातक्र्यलीला विलासैः, समाविष्कृतेशानभास्वत्प्रभावम् ।
अहंभावहीनं प्रसन्नात्मभावं, नमामी ।। 6 ।।
सताः विश्रमाराममेवाभिरामं सदा सज्जनैः संस्तुतं सन्नमद्घिः ।
जनामोददं भक्तभद्रप्रदं तं, नमामी ।। 7 ।।
अजन्माघमेकं परं ब्रहृ साक्षात्स्वयं संभवं राममेवावतीर्णम् ।
भवदर्शनात्संपुनीतः प्रभोडहं, नमामी ।। 8 ।।
श्री साईशकृपानिधेडखिलनृणां सर्वार्थसिद्घिप्रद ।
युष्मत्पादरजः प्रभावमतुलं धातापि वक्ताडक्षमः ।।
सद्घक्त्या शरणं कृतांजलिपुटः संप्रापितोडस्मि प्रभो,
श्रीमत्साईपरेशापादकमलात्रान्यच्छरण्यं मम ।। 9 ।।
साईरुपधरराघवोत्तमं, भक्तकामविबुधद्रुमं प्रभुम ।
माययोपहतचित्तशुद्घये, चिंतयाम्यहमहनिशं मुदा ।। 10 ।।
शरत्सुधांशुप्रतिमप्रकाशं, कृपापात्रं तव साईनाथ ।
त्वदीयपादाब्जमसमाश्रितानां स्वच्छायया तापमपाकरोतु ।। 11 ।।
उपासनादैवतसाइनाथ स्तैर्मयो-पासनिना स्तुतस्त्वम ।
रमेन्मनो मे तव पादयुग्मे, भृडो, यथाब्जे मकरंदलुब्धः ।। 12 ।।
अनेकजन्मार्जीत-पापसंक्षयो, भवेद्घवत्पादसरोजदर्शनात् ।
क्षमस्व सर्वानपराधपूंजकान्प्रसीद साईश गुरो दयानिधे ।। 13 ।।
श्री साईनाथचरणामृतपूतचित्तास्तत्पादसेवनरताः सततं च भक्त्या ।
संसारजन्यदुरतौधविनिर्गतास्ते कैवल्यधाम परमं समवाप्नुवन्ति ।। 14 ।।
स्तोत्रमेतत्पठेद्घक्त्या यो नरस्तन्मनाः सदा ।
सदगुरोः साईनाथस्य कृपापात्रं भवेद् ध्रुवम ।। 15 ।।
साइनाथकृपास्वर्दुसत्पघकुसुमावलिः ।
श्रेयसे च मनःशुध्यै प्रेमसूत्रेण गुंफिता ।। 16 ।।
गोविंदसूरिपुत्रेण काशीनाथा भिधायिना ।
उपासनीत्युपाख्येन श्री साईगुरवेडर्पिता ।। 17 ।।
श्री गुरुप्रसाद-याचना-दशक,
रुसो मम प्रियांबिका, मजवरी पिताही रुसो ।
रुसो मम प्रियांगना, प्रियसुतात्मजाही रुसो ।।
रुसो भगिनि बंधुही, श्व्शुर सासुबाई रुसो ।
न दत्तगुरु साइ मा, मजवरी कधींही रुसो ।। 1 ।।
पुसो न सुनबाई त्या, मज न भ्रातृजाया पुसो ।
पुसो न प्रिय सोयरे, प्रिय सगे न ज्ञाती पुसो ।।
पुसो सुहृद ना सखा, स्वजन नाप्तबंधू पुसो ।
परी न गुरु साइ मा, मजवरी कधींही रुसो ।। 2 ।।
पुसो न अबला मुलें, तरुण वृद्घही ना पुसो ।
पुसो न गुरु धाकुटें, मज न थोर साने पुसो ।।
पुसो नच भलेबुरे, सुजन साधुही ना पुसो ।
परी न गुरु साइ मा, मजवरी कधींही रुसो ।। 3 ।।
रुसो चतुर तत्ववित्, विबुध प्राज्ञ ज्ञानी रुसो ।
रुसोहि विदुषी स्त्रिया, कुशल पंडिताही रुसो ।।
रुसो महिपती यती भजक तापसीही रुसो ।
परी न गुरु साइ मा, मजवरी कधींही रुसो ।। 4 ।।
रुसो कवि ऋषी मुनी, अनघ सिद्घ योगी रुसो ।
रुसो हि गृहदेवता, नि कुलग्रामदेवी रुसो ।।
रुसो खल पिशाच्चही, मलिन डाकिनीही रुसो ।
न दत्तगुरु साइ मा, मजवरी कधींही रुसो ।। 5 ।।
रुसो मृग खग कृमी, अखिल जीवजंतू रुसो ।
रुसो विटप प्रस्तरा अचल आपगाब्धी रुसो ।
रुसो ख पवनाग्नि वार अवनि पंचत्तवें रुसो ।
न दत्त गुरु साइ मा, मजवरी कधींही रुसो ।। 6 ।।
रुसो विमल किन्नरा अमल यक्षिणीही रुसो ।
रुसो शशि खगादिही, गगनि तारकाही रुसो ।।
रुसो अमरराजही अदय धर्मराजा रुसो ।
न दत्त गुरु साइ मा, मजवरी कधींही रुसो ।। 7 ।।
रुसो मन सरस्वती, चपलचित्त तेंही रुसो ।
रुसो वपु दिशाखिला कठिण काल तोही रुसो ।।
रुसो सकलविश्वही मयि तु ब्रहृगोलं रुसो ।
न दत्त गुरु साइ मा, मजवरी कधींही रुसो ।। 8 ।।
विमूढ़ म्हणुनी हंसो, मज न मत्सराही डसो ।
पदाभिरुचि उल्हसो, जननकर्दमीं ना फसो ।।
न दुर्ग धृतिचा धसो, अशिवभाव मागें खसो ।
प्रपंचि मन हें रुसो, दृढ विरक्ति चित्तीं ठसो ।। 9 ।।
कुणाचिहि घृणा नसो, न च स्पृहा कशाची असो ।
सदैव हृदयीं वसो, मनसि ध्यानिं साई वसो ।।
पदीं प्रणय वोरसो, निखिल दृश्य बाबा दिसो ।
न दत्त गुरु साइ मा, मजवरी कधींही रुसो ।। 10 ।।
पुष्पांजली,
ऊँ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माण प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्या संति देवाः ।।
ऊँ राजाधिराजाय प्रसहृसाहिने नमो वयं वैश्रवणाय कूर्महे ।
स मे कामान्कामाय महृं कामेश्वरो वैश्रवणो दधातु ।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः । ऊँ स्वस्ति ।
साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठयं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी स्यात्सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यताया एकराळिति ।
तदप्येष श्लोकोडभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे ।
आविश्रितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।।

करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वाडपराधम् ।
इन हाथ-पैर के कॄत्य से, या वाणी-शशीर् के कर्म से, य सुनने-देखने से,या मन से, या कोई अन्य अपराध
विदितमविदितं वा सर्वमेतत्क्षमतस्व जय जय करुणाब्धे (श्रीप्रभो साईनाथ) ।।1 ।।

______________________________________________________

शेजारती रात्रि 10 बाजता,
ओंवाळूं आरती माइया 0सदगुरुनाथा, साईनाथा ।।
पांचाही तत्वांचा दीप लाविला आतां ।।
निर्गुणाची स्थिति कैसी आकारा आली ।।
सर्वा घटीं भरुनि उरली सांई माउली ।। ओंवाळूं 0 ।।
रज तम सत्व तिघे माया प्रसवली ।।
मायेचिये पोटीं कैसी माया उद्घवली ।। ओंवाळूं 0 ।।
सातसागरी कैसा खेळ मांडीला ।।
खेळूनियां खेळ अवघा विस्तार केला ।। ओंवालूं 0 ।।
ब्रहांडींची रचना दाखविली डोळां ।।
तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा ।।
सदगुरु (साई सदगुरु) भोळा ।। ओंवाळू ।।

आरती ज्ञानरायाची,

आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ।

सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ।। 

लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी ।

अवतार पांडुरंग । नाम ठेविलें ज्ञानी ।।

कनकाचें ताट करीं । उभ्या गोपिका नारी ।
नारद तुंबरहो । सामगायन करी ।।
प्रगट गुहृ बोले । विश्व ब्रहचि केलें ।
राम जनार्दनी । पायीं मस्तक ठेविलें ।।
आरती तुकारामाची
आरती तुकारामा । स्वामी सदगुरुधामा ।
सत्चिदानन्द मूर्ति । पाय दाखवी आम्हां ।।

राघवे सागरांत । जैसे पाषाण तारिलें ।।
तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकी राछिलें ।।

तुकिता तुलनेसी । ब्रह्म तुकासी आलें ।।
म्हणोनी रामेश्वरें । चरणीं मस्तक ठेविलें ।।
शेजारती 

जय जय साईनाथ आतां पहुडावें मंदिरीं हो ।।

आळवितों सप्रेमें तुजला आरति घेउनि करीं हो ।। जय 0

रंजविसी तूं मधुर बोलुनी माय जशी निज मुला हो ।

भोगिसि व्याधी तूंच हरुनियां निजसेवक दुःखाला हो ।।

धांवुनि भक्तव्यसन हरिसी दर्शन देसी त्याला हो ।
झाले असतील कष्ट अतिशय तुमचे या देहाला हो ।। जय 0
क्षमा शयन सुंदर ही शोभा सुमनशेज त्यावरी हो ।
ध्यावी थोडी भक्तजनांची पूजनादि चाकरी हो ।।
ओंवाळीतों पंचप्राण, ज्योति सुमती करीं हो ।
सेवा किंकर भक्त प्रीती अत्तर परिमळ वारी हो ।। जय 0
सोडुनि जाया दुःख वाटतें साई त्वच्चरणांसी हो ।।
आज्ञेस्तव आशिर्प्रसाद घेउनि निजसदनासी हो ।
जातों आतां येऊं पुनरपि त्वच्चरणाचे पाशीं हो ।
उठवूं तुजला साइमाउली निजहित सादायासी हो ।। जय 0

शेजारती 

आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधूता । करा साइनाथा ।।

चिन्मय हें सुखधामा जाउनि देवा पहुडा एकांता ।।

वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला । बाबा चौक झाडीला ।।

तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ।। आतां 0

पायघडया घातल्या सुंदर नवविधा भक्ती । बाबा नवविधा भक्ती ।
ज्ञानाच्या समया लावुनि उजळल्या ज्योती ।। आतां 0
भावार्थाचा मंचक हृदयाकाशी टांगिला । हृदयाकाशी टांगिला ।।
मनाचीं सुमनें करुनि केलें शेजेला ।। आतां 0
द्वैतांचे कपाट लावुनि एकत्र केलें । बाबा एकत्र केलें ।।
दुर्बुद्घीच्या गांठी सोडूनि पडदे सोडीले ।। आतां 0
आशा तृष्णा कल्पनेचा सोडुनि गलबला । बाबा सांडुनि गलबला ।।
दया क्षमा शांति दासी उभ्या सेवेला ।। आतां 0
अलक्ष्य उन्मनी घेउनी बाबा नाजुक दु:शाला । बाबा नाजुक दुशाला ।। 
निरंजन सदगुरु स्वामी निजविल शेजेला ।। आतां 0

प्रसाद मिळण्याकरितां 
अभंग

पाहें प्रसादाची वाट । द्यावें धुवोनियां ताट ।।

शेष घेउनी जाईन । तुमचें झालिया भोजन ।।

झालों एकसवा । तुम्हां आळवोनीया देवा ॥२॥

तुका म्हणे चित्त । करूनि राहिलों निवांत ॥३॥

प्रसाद मिळाल्यावर

पद

पावला प्रसाद आतां विठो निजावें । बाबा आतां निजावें

आपुला तो श्रम कळों येतसे भावें ॥१॥

आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा, बाबा साई दयाला ।

पुरलें मनोरथ जातों आपुल्या स्थळा ॥२॥

तुम्हांसी जागवूं आम्हीं आपुलिया चाडा बाबा आपुलिया चाडा । 
शुभाशुभ कर्मे दोष हरावया पीडा ॥३॥
तुका म्हणे दिधलें उच्छिष्टाचें भोजन । नाहीं निवडिलें आम्हां आपुलिया भिन्न ॥४॥

शेजआरतीचा कार्यक्रम समाप्त ।
"श्री सच्चिदानंदसदगुरु साईनाथ महाराज की जय"

*********
Click & Read more.....

(Hindi) श्री साई सच्चरित्र

श्री साई सच्चरित्र

श्री साई सच्चरित्र

आओ मिलकर पढ़ें और साथ जुड़ें !

श्री साई सच्चरित्र अध्याय 1

श्री साई सच्चरित्र अध्याय 2

आओ मिलकर पढ़ें और साथ जुड़ें !

Sai Aartian साईं आरतीयाँ